भेटा ‘क्लासी बॉस बेब’सई ताम्हणकरला! डिजिटल डिटॉक्सनंतर केले खास फोटोशूट

6

एंटरटेनमेंट वर्ल्ड | अभिनेत्री सई ताम्हणकरने फेब्रुवारी महिन्यात ती डिजिटल डिटॉक्सवर जात असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. त्यानंतर तिने महिनाभर या डिजिटल डिटॉक्सदरम्यान पाँडेचेरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे शूटिंग उरकले. पण नुकतीच सई मुंबईत आली आणि तिने खास फोटोशूट केले. तिच्या याच ‘क्लासी बॉस बेब’स्टाइल फोटोशूटची झलक आपण पाहणार आहोत.

सईच्या ह्या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. सोशल मीडिया डिटॉक्सचा शुटिंगला खूप फायदा झाल्याचे सईने सांगितले आहे.

सोशल मीडियामुळे चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने फॅन्सना खूप मिस केल्याचे सई म्हणाली. फोटोशूटविषयी सई म्हणाली फोटोशूट किंवा शुटिंग हा रोजच्या कामाचा भाग आहे. पण आता डिजिटल डिटॉक्सनंतर पुन्हा नव्या जोमाने ती परतली आहे.

सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असला, आणि ते आमच्या सारख्या अभिनेत्यांसाठी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट करायचं एक वरदान असलं. तरीही कधीतरी ह्यातून ब्रेक घेऊन आयुष्यातले नव्या अनुभवांना सामोरे जाणे गरजेचे आहे असे सई म्हणाली.