INDvsAUS: घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की

भारताला इतिहास घडवण्याची संधी..

सिडनी | ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाने 322 धावांची मजबूत आघाडी घेतली असून यजमानांवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली आहे. भारताकडून कुलदिप यादवने 5 बळी घेतले आहे. रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीने 2 तर, बुमराहने एका फलंदाजांला माघारी धाडले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 300 धावा करुन तंबूत परतला. दरम्यान, अंधुक प्रकाशामुळे सामना थांबला असून ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव बिनबाद 6 धावांवर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळही अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला होता. भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकून इतिहास घडवण्याची नामी संधी आहे..