निलेश राणे यांना पाठींबा द्या, राष्ट्रवादीचा निरोप?

2

मुंबई | ‘नारायण राणे हे आपलेच आहेत’ असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी बुधवारी एका मेळाव्यात केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आघाडीला योग्य उमेदवार सापडत नसल्याने तेथे राणेंचे सुपुत्र नीलेश राणेंना पाठिंबा द्यावा, असा निरोपही राष्ट्रवादीने पाठवला आहे.

यावेळी राष्ट्रवादीने स्वाभिमान पक्षाला ‘परत या’ अशी साद दिली आहे. मात्र, राणे यांनी कॉंग्रेसला दगा दिल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्‍न उपस्थित होतोच कुठे? असा सवाल करत कॉंग्रेसने प्रथम नकार दिला होता. नंतर ‘रावेरची जागा आम्ही लढवतो, तुम्ही रत्नागिरीत काय ते करा’ असा निरोप कॉंग्रेसने राष्ट्रवादीला पाठवला पाठवला असल्याचे समजतंय. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची गणिते डोळ्यासमोर ठेऊन, राष्ट्रवादीने ही चाल खेळली असली तरी नारायण राणे सकारात्मक प्रतिसाद देतील का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.