राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत पार्थचे नाव नाही, हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना पाठिंबा

1

एएम न्यूज नेटवर्क | लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळेंसह एकूण 11 मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देणार आहे.

जाहीर झालेले उमेदवार

बारामती  सुप्रिया सुळे
उत्तर-पूर्व मुंबई  संजय दिना पाटील
ठाणे  आनंद परांजपे
रायगड  सुनील तटकरे
लक्षद्वीप मोहम्मद फैजल
सातारा  उदयनराजे भोसले
कोल्हापूर  धंनजय महाडिक
हातकणंगले  स्वाभिमानी संघटना
कल्याण  बाबाजी पाटील
परभणी  राजेश विटेकर
जळगाव  गुलाबराव देवकर
बुलडाणा  राजेंद्र शिंगणे

पार्थ पवारच्या नावावर सस्पेंस कायम

दरम्यान, राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे पार्थ पवार मावळमधून लोकसभेच्या मैदानात उतरणार की नाही, हे अजूनही स्पष्ट जालेले नाही. शरद पवार यांनी बारामतीच्या पत्रकार परिषदेत पार्थ पवार मावळमधून लढवणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मात्र त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांचा गोंधळ उडाला होता. त्यात या यादीत पार्थ पवारचे नाव नसल्याने अद्याप याबाबत निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट आहे.