राहुल गांधींचा जीवनपट उलगडणार, ‘माय नेम इज रा गा’चा टीझर प्रदर्शित

मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकवरील चित्रपटांचे वारे वाहत आहे. 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक येत आहेत. नुकताच बाळासाहेब ठाकरे यांचा ‘ठाकरे’ हा बायोपिक रिलीज झाला. यापुर्वी मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर आधारित ‘द अॅक्सीडेंटल प्रायमिनिस्टर’ हा चित्रपट रिलीज झाला. आता या पाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘माय नेम इज रा गा’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा टीझरही प्रदर्शित झाला आहे.

टीझरमध्ये राहुल गांधीच्या बालपणापासून तर आतापर्यंतच्या आयुष्याचा जीवनप्रवास दिसतोय. या टीझरच्या सुरुवातीला राहुल गांधी च्या एका दृष्याने होतेय आणि नंतर इंदिरा गांधींच्या हत्येचे दृश्य दाखवले आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे राहुल गांधी यांच्या आयुष्यावर आणि मनावर होणा-या परिणाम या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत. टीझरच्या शेवटी 2019च्या लोकसभा निवडणुकांचे तापलेल्या वातावरणाचे दृश्य दाखवण्यात आले आहेत.

या चित्रपटाची पटकथा रूपेश पॉल यांनी लिहिली आहे. राहुल गांधी यांचं बालपण, अमेरिकेतील विद्यार्थी जीवन आणि राजकीय वादविवादांचं चित्रण यात करण्यात आलं आहे.

राहुल गांधींची भूमिका अश्विनी कुमार याने साकारली आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणाचेही काही दृष्ये चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहेत. मोदींची भूमिका हिंमत कपाडिया यांनी साकारली आहे.