गिरगाव चौपाटी येथे पोलिसांची बोट बुडाली; बोटीतील पोलिस सुखरूप

(संग्रहित फोटो)

मुंबई | गिरगाव चौपाटी येथे पोलिसांची सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास समुद्रात बुडाली. हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या जीवरक्षकाने प्रसंगावधान दाखवत त्यांचे प्राण वाचवले. प्रतीक वाघे असे या जीवरक्षकाचे नाव आहे. या बोटीत एकूण सहा पोलिस कर्मचारी होते. यातील एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलिसांचे एक पथक या बोटीत होते. या सहाही पोलिसांकडे लाइफ जॅकेट नसल्याचे समोर आले.