Forbes : मुकेश अंबानी ठरले जगातील 13 वे धनकुबेर, अब्जाधीशांच्या यादीत पतंजलीचे बालकृष्णही

1

एएम न्यूज नेटवर्क | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 13 व्या स्थानावर आहेत. फोर्ब्सने जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यानुरसार मुकेश अंबानी 13 व्या क्रमांकावर आहेत. यापूर्वी ते या यादीत 19 व्या क्रमांकावर होते. या यादीत अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. तर दुसऱ्या स्थानी बिल गेट्स आहेत.

गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये मुकेश अंबानी यादीत 19 व्या क्रमांकावर असताना त्यांची संपत्ती 40.1 अब्ज डॉलर होती. त्यामध्ये 2019 मध्ये 10 अब्ज डॉलरची वाढ झाली असून त्यांची संपत्ती 50 अब्ज डॉलवर पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी यादीत 13 व्या क्रमांकावर उडी मारली.

अंबानींसह भारतात 106 अब्जाधीश आहेत. त्यामध्ये 36 व्या क्रमांकावर विप्रोचे अजिम प्रेमजी आहेत. त्यांची संपत्ती 22.6 अब्ज डॉलरची आहे. तर त्यानंतर एचसीएलचे सहसंस्थापक शीव नडार यांचा 82 वा क्रमांक आहे. तर 91 व्या क्रमांकावर लक्ष्मी मित्तल आहे. पहिल्या 100 जणांध्ये भारताच्या या चार अब्जाधीशांचा समावेश आहे. त्याशिवाय इतर अब्जाधीशांध्ये कुमार बिर्ला, गौतम अदानी, सुनील मित्तल यांच्यासह पतंजलीचे सीआओ आचार्य बालकृष्णा यांचागी समावेश आहे. ते यादीत 365 व्या स्थानावर आहेत.