खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी लुटला पोहण्याचा आनंद

कोल्हापूर | छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चंदगड तालुक्यातील धलगरवाडी येथे संभाजीराजे यांनी पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ते काल चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते.

प्रचारासाठी गेले असताना संभाजीराजे यांना पोहण्याचा मोह आवडला नाही. दुपारी धनगरवाडी रस्त्याकडेला असलेल्या नदीत त्यांना पोहणारी मुले दिसली. संभाजीराजेंनी कोणताही विचार न करता गाडी थांबवली आणि पोहणाऱ्या मुलांची गंमत पाहत राहिले. काही क्षणातच त्यांनी देखील स्वतःचे कपडे काढले आणि चक्क नदीत सुळकी उडी मारली. राजांच्या सोबत असलेल्या कोणालाही समजायच्या आत राजे सराईतपणे पोहू लागले आणि सर्वजण पाहतच राहिले. तलावातील पोहणारी मुले सुद्धा आश्चर्याने स्तब्ध झाली होती. मात्र संभाजीराजे यांनी आपले राजेपण विसरून त्यांच्यातलेच एक होऊन मस्तपैकी नदीत पोहण्याचा आनंद घेताना पाहायला मिळाले.