मराठा आरक्षण रद्द करा, इम्तियाज जलील यांची हायकोर्टात याचिका

मुंबई | एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाच्या 16% आरक्षणाला त्वरित स्थगिती द्यावी, तसेच याबाबतचा न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल रद्द करावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. तरी देखील त्याला डावलले जात आहे. त्यामुळं मुस्लिम समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करून सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तात्काळ आरक्षण मंजूर करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. वकील सतिश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.