परजातीत प्रेमसंबंधांची विवाहितेला अमानुष शिक्षा, गावकऱ्यांनी नवऱ्याला खांद्यावर उचलून न्यायला भाग पाडले

झाबुआ (मध्य प्रदेश) । परजातीतील पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मध्यप्रदेशात एका विवाहितेला अमानुष शिक्षा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांनी विवाहितेला अवैध संबंधामुळे नवऱ्याला खांद्यावर उचलून न्यायला भाग पाडले.

मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये ही संतापजनक घटना उघडकीस आली असून या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. परजातीतील पुरुषाशी अवैध संबंध ठेवल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी विवाहितेला ही अमानुष शिक्षा दिली. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागले आहे.