वादाच्या भोवऱ्यात अडकल्या मंदा म्हात्रे, दोन मतदारसंघात मतदान करण्याचे केले आवाहन

मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या प्रचारसभा सुरू आहे. मतदारांनी आपल्या पक्षा मतं द्यावी यासाठी राजकीय नेते मंडळी भाषण करताना दिसत आहेत. मात्र आता याच कारणांमुळे नवी मुंबईतील भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे अडचणीत सापडल्या आहेत. यांनी चक्क मतदारांना लोकसभेत दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

कोपरखैरणे येथे युतीच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणा लोकसभा उमेदवार राजन विचारे आणि सातारा लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती. दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असून पश्चिम महाराष्ट्रातील मोठी मतदार संख्या नवी मुंबईत वास्तव्यास आहे. विशेषता माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांना सातारा येथे जाऊन शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांना 23 एप्रिल रोजी मतदान करण्याचे सांगितले. तर परत 29 एप्रिल रोजी ठाणे लोकसभेचे मतदान असल्याने परत येऊन शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त होत केले जात आहे. दरम्यान याप्रकरणी आता विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्याची तक्रार केली आहे.