मलबार हिलचे नामकरण ‘रामनगरी’ करा-दिलीप लांडे

मुंबई – शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी मलबार हिल या भागाचं नाव “रामनगरी” करण्यात यावे अशी मागणी महानगरपालिका सभागृहात केली आहे. सीता मातेच्या शोधार्थ निघालेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांनी काही काळ “मलबार हिल” परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे मलबार हिल चे नाव बदलून रामनगरी करावे अशी मागणी दिलीप लांडे यांनी पालिका सभागृहात केली आहे.

सदर सूचनेसाठी महापालिकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, आयुक्तांकडे अभिप्रायसाठी पाठवली जाणार असून आयुक्त्यांच्या अभिप्राय मिळाल्यावर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.