महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार मतदान, जाणून घ्या तुमच्या मतदारसंघातील मतदानाची तारीख

7

मुंबई | देशभरातील लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. 2019 लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक काल जाहीर झाले. एकुण सात टप्प्यात देशभरात मदतान होणार आहे. तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व निकाल हे 23 मे रोजी लागणार आहेत. महाराष्ट्रात संपूर्ण एप्रिल महिन्यात हे चार टप्पे पुर्ण होतील. 11 एप्रिल ते 29 एप्रिल या काळा महाराष्ट्रात मतदान होईल. तुमच्या मतदार संघात मतदान कधी होणार याविषयी जाणून घ्या सविस्तर…

महाराष्ट्रात 4 टप्प्यांत लोकसभा निवडणूक

पहिला टप्पा : 11 एप्रिल रोजी 7 मतदारसंघांत मतदान
दुसरा टप्पा: 18 एप्रिल रोजी 10 मतदारसंघांत मतदान
तिसरा टप्पा: 23 एप्रिल रोजी 14 मतदारसंघांत मतदान
चौथ टप्पा: 29 एप्रिल रोजी 17 मतदारसंघांत मतदान

पहिला टप्पा : 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान

भंडार-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम वर्धा रामटेक नागपूर

दुसरा टप्पा : 18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

तिसरा टप्पा : 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान

माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,  कोल्हापूर,  हातकणंगले,  जळगाव,  रावेर, जालना औरंगाबाद, रायगड,
पुणे,  बारामती,  अहमदनगर

चौथा टप्पा : 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य दक्षिण,  मुंबई, नंदुरबार धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे मावळ, शिरुर शिर्डी

पहिला टप्पा 11 एप्रिल

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात 18 मार्चपासून
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 मार्च
उमेदवारी अर्ज छाननी 26 मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 28 मार्च
मतदान 11 एप्रिल

 

दुसरा टप्पा 18 एप्रिल

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात 19 मार्चपासून
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 मार्च
उमेदवारी अर्ज छाननी 27 मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 29 मार्च
मतदान 18 एप्रिल

 

तिसरा टप्पा 23 एप्रिल

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात 28 मार्चपासून
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल
उमेदवारी अर्ज छाननी 5 एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल
मतदान 23 एप्रिल

 

चौथा टप्पा 29 एप्रिल

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात 02 एप्रिल
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल
उमेदवारी अर्ज छाननी 10 एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल
मतदान 29 एप्रिल

 

23 मे रोजी या सर्व निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.