2 वर्षात 72 हजार पदांची मेगाभरती : फडणवीस

नोकर भरतीचा मार्ग खुला, 36 हजार पदांची तत्काळ भरती

मुंबई | राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षात 72 हजार पदे भरण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलंय. मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेली सरकारी मेगा नोकरभरती तात्काळ सुरू करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पहिल्या वर्षी 36 हजार, तर दुसऱ्या वर्षीही तितकीच पदे भरली जातील.

24 हजार शिक्षकांच्या भरतीतही मराठ्यांना 16 टक्के आरक्षण लागू
मराठा आरक्षणाआधी 24 हजार शिक्षक भरतीचा निर्णय झालेला आहे. मात्र त्यात मराठा समाजाला 16% जागा राखीव ठेवण्याची मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एसईबीसी प्रवर्गासाठी जागा राखीव असतील, असे सांगितले आहे.