लोकसभा दुसरा टप्पा: सायंकाळी 5 वाजता प्रचार थंडावणार, 13 राज्यांतील या 97 मतदारसंघांत 18 ला होणार मतदान

एएम न्यूज नेटवर्क । लोकसभा निवडणूक 2019 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. मंगळवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावणार आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी देशात 13 राज्यांत 97 जागांवर 18 एप्रिल रोजी मतदान होईल. तर निकाल 23 मे रोजी येईल. भाजप, काँग्रेससहित तमाम राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राच्या 10, आसामच्या 5, बिहारच्या 5, छत्तीसगढच्या 3, जम्मू-कश्मीरच्या 2, कर्नाटकच्या 14, महाराष्ट्राच्या 10, मणिपूरची एक, ओडिशाच्या 5, तामिलनाडूच्या सर्व 39, उत्तर प्रदेशच्या 8, पश्चिम बंगालच्या 3 आणि पुद्दुच्चेरीमध्ये एका जागेवर 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

महाराष्ट्र
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदान होईल.

उत्तर प्रदेश
नगिना, अमरोहा, बुलंदशहर, अलिगड, हाथरस, मथुरा, आग्रा आणि फतेहपूर सीकरी मतदारसंघात मतदान होईल.

आसाम
करीमगंज, सिलचर, मंगलाडोई, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट आणि नौगाव मतदारसंघात मतदान होणार आहे.

बिहार
किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूरच्या बांका मतदारसंघात मतदार आपला हक्क बजावतील.

छत्तीसगड
राजनांदगाव, महासमुंद आणि कांकेर लोकसभा जागेवर मतदान होईल.

जम्मू
श्रीनगर आणि उधमपूर मतदारसंघात मतदान होणार आहे.

कर्नाटक
उडुपी-चिकमंगलूर, हासन, दक्षिण कन्नड़, चित्रदुर्गा, तुमकूर, मांड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगळुरू उत्तर, बंगळुरू मध्य, बंगळुरू दक्षिण, चिक्काबल्लापूर आणि कोलार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

मणिपुर
आंतरिक मणिपूर.

ओडिशा
बरगड, सुंदरगड, बोलांगीर, कंधमाल, अस्का.

तामिळनाडू
तिरुवल्लूर, चेन्नई नॉर्थ, चेन्नई साउथ, चेन्नई सेंट्रल, श्रीपेरंबदूर, कांचीपुरम, अराकोनम, वेल्लोर, कृष्णागिरी, धर्मपुरी, तिरुवन्नामलाई, अरानी, विलुपुरम, कल्लाकुरिची, सलेम, नमक्कल, इरोड, तिरुप्पूर, नीलगिरी, कोइंबतूर, पोलाची, डिंडीगुल, करूर, तिरुचिरापल्ली, पेरांबलूर, कुडालोर, चिदंबरम, मायिलादुथराई, नागापट्टिनम, थंजावूर, शिवगंगा, मदुरई, थेनी, विरुधुनगर, रमनाथापुरम, थूथूकुडी, टेनकासी, तिरुनेलवेली, कन्याकुमारी.

त्रिपुरा
त्रिपुरा पश्चिम

पुद्दुचेरी
पुद्दुचेरीत मतदान.

पश्चिम बंगाल
जलपायगुडी, दार्जिलिंग आणि रायगंज लोकसभा जागेवर मतदान.