LIVE NEWS: देशासह राज्यातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर...

दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा

03-December-2019 01:49: PM

पुणे - माणिकबगेजवळील कुदळे पार्क सोसायटी जवळील राधाकृष्ण आपर्टंमेटमध्ये  तरुणीचा गळा आवळून खून. तेजशा शामराव पांजाळ असे मृत तरुणीचे नाव आहे. तेजशा मुळची बीडची नोकरीसाठी आली होती पुण्यात उच्चशिक्षीत तरुणीच्या खूनाने पुणे हदराले आहे. 

03-December-2019 12:56: PM

येवला तालुक्यातील मालखेडा येथील पुंडलिक अहिरा जी होंडे या शेतकऱ्याला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला 12 हजार 250 रुपये हा विक्रमी भाव मिळाला असून 8 क्विंटल 65 किलो वजनाला 105870 रुपये मिळाल्याने हा शेतकरी खूप आनंदी झाल्याने सरकारचे आभार मानले आहे. त्याने सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती हा कांदा विक्रीसाठी आणला होता. सध्याच्या अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ही भाव वाढ झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

03-December-2019 12:51: PM

डोंबिवलीत अजून एक अपघात, कल्याण डोंबिवलीचे राष्ट्रवादी शिक्षक सेलचे जिल्हापदाधिकारी प्रभाकर ठोके यांचा जागीच मृत्यू

03-December-2019 11:36: AM

वाळूज महानगर परिसरात हैद्राबाद येथील डाँ.प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अत्याचार निषेधार्थ विविध सामाजिक संघटना व शाळेच्या वतीने जाहीर निषेध

03-December-2019 11:36: AM

शाहूवाडी तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी, हवामानात बदल

03-December-2019 11:36: AM

वर्धा

- जिल्ह्यातील आर्वि शहरात चोरट्याचा डाव फसला,आवाज येताच ठोकली धुम

- युवतीला पळवृन नेणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

- शेतातून 30 पाईप चोरट्यांनी केले लंपास

- बॅंकेच्या कर्मचाऱ्यास पोलिस शिपायाकडून मारहाण

- महिला  काँग्रेसकडून डॉ. प्रियंका रेड्डी घटनेचा निषेध

- कामगाराचे तिसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरुच

- कामगारांच्या आंदोलन संदर्भात नगरपालिकेत होणार बैठक

03-December-2019 11:35: AM

तळा : नव्याने बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालय पाणी नसल्याने अधून मधून बंद, नागरिकांचे हाल, सरकारचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता.

03-December-2019 11:15: AM

पाण्याच्या टाकीत बुडून लहान मुलाचा मृत्यू, नाशकातील घटना

03-December-2019 11:09: AM

तळा : नव्याने बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालय पाणी नसल्याने अधून मधून बंद, नागरिकांचे हाल, सरकारचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता.

03-December-2019 10:36: AM

टोल कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला, संगमनेर तालुक्यातील घटना, टोल देण्यावरून झाली वादावादी, संगमनेर शहरातील तरूणांनी घातला हैदोस

03-December-2019 10:29: AM

मुंबईच्या माहीममध्ये सुटकेसमध्ये सापडले मानवी शरीराचे तुकडे, हत्या करून मृत देहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरले. सोमवारी संध्याकाळची  घटना असल्याची माहिती. पुरुषाचा मृतदेह असल्याची पोलिसांची माहिती. अधिक तपास मात्र पोलीस करत आहे.

03-December-2019 10:08: AM

पुण्यात आज पहाटे कोरेगाव पार्क येथील सेंट मीरा कॉलेज समोर सेवरॉलेट कारला अपघात झाला आहे. चालकाचा कार वरील नियंत्रण सुटल्याने कार डीवायडर तोडून जवळपास 2 - 3 फूट आता चिरली गेली आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

03-December-2019 10:08: AM

बलात्कार निषेधार्थ भररस्त्यात आरोपीचा पुतळा जाळून निषेध. अशीच शिक्षा आरोपींना दिली गेली पाहिजे त्याशिवाय बलात्कार विकृती संपणार नाही. कायदे कडक करा 6 महिन्यात शिक्षा द्या तरच महिला सुरक्षित आणि सक्षम वावरू शकतील प्रियांका रेड्डीच्या अत्याचार निषेधार्थ पुण्यात मनसेच्या महीला सेनेच्या रुपाली पाटील आणि महिलांनी  मारेकऱ्यांचे पुतळे जाळले, अक्रमक महिलांनी निषेधाच्या घोषणांनी परीसर  दणाणून सोडला. मंडईतील टिळक पुतळ्या समोरील या अक्रमक आंदोलनामुळे काही काळ वातावरण ढवळून निघाले.

03-December-2019 10:04: AM

औरंगाबाद एन- 1, सिडको भागातील काळा गणपतीच्या पाठीमागे घराच्या कंपाउंडमध्ये घुसला बिबट्या, वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू 

03-December-2019 10:03: AM

पुणे; बीडच्या तरुणीचा माणिकबगेत संशयस्पद मृतदेह आढळला, तेजशा शामराव पांजाळ असे मृत तरुणीचे नाव. तेजशाचा एका मित्रावर पोलीसांचा संशय.

03-December-2019 10:03: AM

करमाळा

- कुंभेज ग्रामपंचायत सदस्यपदी अनिता पवळ यांची बिनविरोध निवड

- राष्ट्रीय वारकरी परिषदच्या तालुका उपाध्यक्षपदी नाना महाराज पठाडे यांची निवड

- उजनी जलाशयातील मगरीचा शोध घेण्याची उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीची मागणी

- राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत गुलमोहरवाडीच्या कुणाल काळे चा प्रथम क्रमांक

- 42 महिन्यांच्या वेतनासाठी आदिनाथच्या कामगारांचे आंदोलन

- मांजरगाव येथील मोरे कुटूंबियांनी स्मृतीवृक्षाची लागवड करून समाजासमोर ठेवला आदर्श

03-December-2019 10:02: AM

- मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे विष पाजुन केला विवाहित महिलेचा खुन.
- मुखेड येथिल उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने जागतीक एड्स दिनानिमित्य जनजाग्रन रॅली संपन्न.
- मुखेड तालुक्यातील जांब येथे पिकाला हमीभाव व पिकविमा तात्काळ मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
- मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे शहीद टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी.

03-December-2019 10:02: AM

अंबरनाथ

- चुकीची औषधं आणि इंजेक्शन दिल्यानं 10 ते 12 रुग्ण अत्यवस्थ

- अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयातील प्रकार

- 8 रुग्णांना उपचारार्थ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवलं

- रुग्णांना एक्सपायरी झालेली औषधं दिल्याचा प्राथमिक अंदाज

- कोणी दोषी आढळल्यास कारवाई करू अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांची प्रतिक्रिया

- छाया रुग्णालयाच्या कारभारावर रुग्णाच्या नातेवाईकांकडून संताप

03-December-2019 10:01: AM

अंबाजोगाई

- स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जागतिक एडस् दिन साजरा.

- पोषण आहार खिचडीला उधारीचा आधार 48 शाळांमधील खिचडी खर्च मानधन वर्षभरापासून रखडले.

- झाडांना अन्नघटकांचा समतोल पुरवठा आवश्यक- शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी यांचे मत

03-December-2019 10:01: AM

बीड धारूर - दहिफळ येथे खंडेरायाचा विवाह सोहळ्यास मल्हारी भक्ताची मोठी गर्दी

धारूर -- किल्ल्यातील जलसाठे जतन करण्यासाठी भुमीपुञाचे स्वच्छता अभियान

03-December-2019 10:01: AM

जालना 
- ट्रक चालकाला लुटणारे दोन तोतया पोलीस जेरबंद, चंदनझिरा पोलिसांची कारवाई

- मंठा तालुक्यातील केंधळीजवळ कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

- शहागडममध्ये एका शाळकरी मुलीचं अपहरण

- बदनापूर नगरपंचायत कार्यालयात नगरसेवकाला मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

- आन्वा परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली

AM News Developed by Kalavati Technologies