LIVE NEWS | देशासह राज्यातील महत्वाच्या घटनांचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर...

दिवसभरातील सर्व महत्वाच्या घटनांचा वेगवान आढावा

26-March-2020 02:43: PM

विक्रोळीत गोरगरीब नागरिकांना 21 दिवस तीन टाईम जेवण वाटप
कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू असल्यामुळे व त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस नागरिकांना घरामध्ये बसण्यासाठी आहवान केले आहे. त्यामुळे रोजंगारीवर काम करणाऱ्या नागरिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीमध्ये पैशांअभावी या नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा पडू नये यासाठी विक्रोळी येथील काही नागरिक एकत्रित येत रस्त्यावरील गोरगरीब नागरिकांना संपूर्ण 21 दिवस तिन टाईम नाष्टा व जेवणाचे वाटप करणार आहेत.

26-March-2020 02:38: PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डोंबिवली महापालिकेकडून अनेक उपाययोजना राबविल्या जातात आहेत. शहरात साफसफाई केली जात आहे. 20 फवारणी ट्रॅक्टरच्या मदतीने संपूर्ण शहरात फवारणी केली जात आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या फवारणी ट्रॅक्टरसह ग्रामीण भागातील एनजीओच्या मदतीने शेतात फवारणी करणाऱ्या फवारणी ट्रॅक्टर मागून केडीएमसी कर्मचारी  ही फवारणी करत आहे.

26-March-2020 11:45: AM

डोंबिवलीमध्ये कोरोनाचा 6 वा रुग्ण, तुर्की वरुण आला होता रुग्ण,स 6 पैकी 2 रुग्णांमध्ये सुधारणा, यात 3 वर्षांच्या मुलीची ही प्रकृती स्थिर

26-March-2020 10:12: AM

कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी राज्यातील संपूर्ण प्रशासन व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा जीवापाड कष्ट घेत आहेत. यातच आता औरंगाबाद जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले सरकारी वाहन आणि पोलीस सुरक्षा काढून ती जनतेसाठी वापरावी असं सांगितलं असून मंत्री संदीपने भुमरे यांनीही आपली सुरक्षा वाहने आणि कर्मचारी यांनी सुरक्षा यांतरणांवर वाढता ताण पाहता ती जनसेवे साठी वापरावी असं पत्र प्रशासनाला दिल आहे.

26-March-2020 09:39: AM

कोल्हापूर 
इस्लामपुरातील कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कातील मुलीचे वास्तव्य कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावात, या मुलीच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पेठवडगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

26-March-2020 09:32: AM

सोलापूर

जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू, 900 जणांवर कारवाई, यामध्ये 200 विविध प्रकारचे गुन्हे दाखल, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

26-March-2020 09:31: AM

नांदेड 
- शहरातील देगलूर नाका परिसरात गोळीबार, एकाचा मुत्यू तर एक जण गंभीर जखमी
- संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांतर्फे नियमाचं उल्लंघन करणाऱ्या चार दिवसात 1400 वाहनधारकांवर कारवाई
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपातर्फे शहरात औषधी फवारणी
- वजिराबाद येथे शहरातील सर्व दुकानांसमोर योग्य अंतर राखण्यासाठी चौकोन आखले, पोलीस अधीक्षकांकडून स्वतः खरेदीचे प्रात्यक्षिक
- हातावर पोट असणाऱ्यांना महानगरपालिका देणार दोन वेळेचे जेवण

26-March-2020 09:31: AM

मुखेड

- जनता कर्फ्यूमध्ये पोलीस कर्मचार्याचे कडेकोट बंदोबस्त 
- नगर परिषदेच्या वतीने शहरात जंतुनाशक फवारणी 
- नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या वतीने गरीबांना धान्याचे वाटप

26-March-2020 09:30: AM

बीड 

- पाच दिवसात बीड जिल्ह्यात महानगरातून 42 हजार नागरिक दाखल

- कोरोनाला हरवल्यावरच यशाची गुडी उभारणार - पंकजा मुंडे

- संचार बंदीत फिरणाऱ्या 19 जनावर गुन्हे दाखल

- केज पोलिसांनी वाटले स्वखर्चाने गरिबांना अन्न धान्य

- स्वस्त दरात सर्व रेशनकार्ड धारकांना धान्य वाटप करण्याच्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सूचना

- बंदच्या नावाखाली जीवनावश्यक वस्तूची जिल्ह्यात चढ्या भावाने विक्री

- जिल्ह्यातील 264 हंगामी ऊसतोड मजुरांचे वसतिगृह बंद

26-March-2020 09:29: AM

करमाळा

- निमगाव हवेली येथे दहा निराधार महिलांना मोफत किराणा वाटप

- कोरोनाची कुऱ्हाड शेतकऱ्यांच्या मुळावर ; आठवडा बाजार, जिल्हा आणि मार्केट कमिटी बंद

- तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल,डिझेल विक्री बंद

- विनाकारण मोटारसायकलवर फिरणाऱ्यांच्या गाड्याच्या फोडल्या हेडलाईट पोलिसांची कारवाई

- तालुक्यातील केतूर, जेऊर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

- तालुक्यातील 118 गावांसाठी 67 पोलीस कर्मचारी

- कोरोनाशी लढण्यास प्रशासन सज्ज ; खासगी डॉक्टरांना खबरदारी घेण्याचे तहसीलदार यांनी निर्देश

26-March-2020 09:29: AM

जालना
- घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

- भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे 40 हजारांची दारू जप्त, दोघांविरोधात गुन्हा दाखल

- संचारबंदीचे उल्लंघन करणार्या तीन जणांवर जाफराबादेत गुन्हा दाखल

- बंदचे आदेश असतानाही पान विक्री केल्यानं परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

26-March-2020 09:29: AM

हिंगोली

- वाहतूक शाखेकडून एकाच दिवसात 488 दुचाकीवर कार्यवाही, 4 लाख 23 हजार दंड वसूल

- हिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 'त्या' 10 नागरिकांना केलं होम क्वॉरनटाईन

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व्हीआरआरटी पथकामार्फत 11 हजार 302 नागरिकांची तपासणी

- आरोग्य सहाय्यीकेला पोलिसांकडून जबर मारहाण, घटनेचा निषेध

26-March-2020 09:28: AM

सोलापूर

सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन मंडळातून 5 कोटी रुपये खर्चाची परवानगी

सोलापूर - अफवा पसरवणा-या व्यक्तींवर कडक कारवाई; पोलीस अधीक्षक

सोलापूर - जनतेला महिन्याचे धान्य मोफत द्या; माजी आमदार नरसय्या आडम

AM News Developed by Kalavati Technologies