LIVE NEWS | देशासह राज्यातील महत्वाच्या घटनांचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर...

दिवसभरातील सर्व महत्वाच्या घटनांचा वेगवान आढावा

23-May-2020 01:33: PM

सांगली | धारावीतून आलेल्यांपैकी बारा वर्षाची मुलगीही कोरोना बाधित, धारावी येथून सांगली जिल्ह्यात आलेल्यांपैकी आणखी एक बारा वर्षाची  मुलगी कोरोना बाधित झाली असून सध्या मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचाराखाली आयसोलेशन कक्षामध्ये दाखल आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सध्यस्थितीला सांगली जिल्ह्यात 31 जण कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.सतर आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यात एकूण 73 रुग्ण पोझेटिव्ह सापडले आहेत. आता पर्यंत 40 निगेटिव्ह, आणि 2 मयत तर अद्याप 31 जण पॉझिटिव्ह आहेत. 

23-May-2020 11:27: AM

लॉकडाउन काळात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले, सोशल माध्यमाद्वारे अफवा पसरवण्याचे काम होत आहे. तरी तसे करू नये, अफवा,भडकावू पोस्ट टाकणाऱ्यावर कडक कारवाई करणार, आतापर्यंत 410 गुन्हे दाखल करून 213 लोकांना अटक केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

23-May-2020 11:17: AM

हिंगोलीत मुंबईहून आलेले आणखी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, औंढा नागनाथ तालुक्यातील एका 45 वर्षे व्यक्तीसह वसमत तालुक्यातील 5 व्यक्तीना कोरोनाची बाधा, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 107 वर, आतापर्यंत 89 रुग्णांनी केली कोरोनावर मात, 18 कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू

23-May-2020 09:40: AM

परभणी जिल्ह्यात पुन्हा दोन रुग्ण आढळले, परभणी शहरात एक व जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील एक परभणी जिल्ह्यात रुग्णांची संख्या 22 वर

23-May-2020 09:37: AM

सोलापूर

32 नवे रुग्ण आढळले, सोलापूरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 548 वर, आत्तापर्यंत 40 जणांचा मृत्यू, 224 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

23-May-2020 09:10: AM

सोलापूर

सोलापूर - सोलापूरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांचे 87 हजार 48 अर्ज ; प्रशासनाची माहिती

सोलापूर - या वर्षातील सर्वोच्च 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पंढरपूर - गुन्ह्याचा शोध घेणा-या पोलिसांकडे आता होम क्वारंटाईनचा तपास

पंढरपूर - पाणीपुरवठा करणाऱ्या बंधा-यातील पाणी पातळी खालावल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा

23-May-2020 09:10: AM

करमाळा 

- आगारातून टेंभुर्णी, पंढरपूर, कुर्डुवाडी ग्रामीण भागात एस टी बस सेवा सुरू

- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पोथरे येथे तिघांजणांवर गुन्हा दाखल

- लॉकडाऊनचा फायदा उठवत कामोणे व देवीचामाळ येथील दोन युवती बेपत्ता

- आवाटी - सालसे रस्त्यावर बोलेरो गाडीच्या अपघातात एकाचा मृत्यू

- उजनी धरणातील पाण्याची हळूहळू मृत साठ्याकडे वाटचाल

- तालुका पत्रकार संघाच्यावतीने करमाळा एस टी महामंडळास निर्जंतुकीकरणासाठी हातपंप भेट

23-May-2020 09:09: AM

मीरा भाईंदर

एकाच दिवसात 51 रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण संख्या 454, आज 11 रुग्ण कोरोना मुक्त, आतापर्यंत 263 कोरोना मुक्त

AM News Developed by Kalavati Technologies