पुलवामा अटॅक Updates : 11 वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, देशभरातून संताप

92

नवी दिल्ली – पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातील नागरिकांमध्ये आक्रोश पसरलेला आहे. राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. नवी दिल्लीमध्ये सकाळीत केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. त्यात पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात आला. त्यानंतरही अनेक घडामोडी सुरूच आहे. याच दिवसभरातील घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.

LIVE Updates…

— शनिवारी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, हल्ल्याबाबत होणार चर्चा

— त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी पुलवामा हल्ल्यातील सर्व मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत (प्रत्येक कुटुंबासाठी) जाहीर केली आहे.

— पुलवामाच्या हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची शिवसेनेची मागणी.

— गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी श्रीनगर येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी बडगाम येथे पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

— दहशतवाद ही समाजाला लागलेली कीड आहे, याला मुळासकट उखडून फेकण्याची गरज असल्याचे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी वक्तव्य केले.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी पुलवामा ह्ल्ल्यातील तमिळनाडूतील 2 शहिदांच्या कुटुंबीयांना 20 लाख रूपयांती मदत जाहीर केली.

— CRPF चे ट्विट – आम्ही विसरणार नाही माफ करणार नाही. या भ्याड हल्ल्याचा घेणार बदला.

— पुलवामा हल्ल्याचा बदला केव्हा, कुठे आणि कसा घ्यायचा हे लष्करच ठरवणार असल्याचे मोदींनी झाशी येथे बोलताना सांगतिले.

— जम्मूमध्ये बस स्टँड, नवाबाद, बक्षी नगर, पीर मिठा, पेक्का दंगा, छन्नी हिम्मत, जनिपूर, दोमना आणि बाग ए बहू परिसरात कर्फ्यू लागू

 

— काश्मिरमध्ये स्थानिक नागरिकांनी केले आंदोलन

 

— नवी दिल्लीत पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली..

 

— हल्ल्यात शहीद झालेले हिमाचल येथील जवान तिलक राज यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी 20 लाखांची मदत जाहीर केली.

 

— राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राजकारण करणार नसून सर्व विरोधक सरकारच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले.

— वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला खडे बोल सुनावले. दहशतवाद्यांनी मोठी चूक केली असून त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

— केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने काढला.

 

— पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक.