नागपुरात बिबट्याच्या हल्ल्यात 9 प्राण्यांचा मृत्यू

गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातली घटना

नागपूर | गोरेवाडा प्राणी संग्रहालयात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल 9 प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याने प्राणी संग्रहालयातील इतर प्राण्यांच्या पिंजऱ्यात शिरून हा हल्ला चढवला आहे. हल्ल्यात 5 चितळ, 5 काळवीट आणि एका चौसिंगाचा मृत्यू झाला आहे. हा बिबट्या काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आला असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे गोरेवाडा केंद्राला इलेक्ट्रॉनिक्स तारेचे कुंपण असूनही बिबट्याने ते ओलांडून प्रवेश करत प्राण्यांवर हल्ला चढवला आहे. या घटनेमुळे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची वनविभागाकडून चौकशी सुरू आहे.