Ind vs Aus : भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘ऐतिहासिक’ विजय

सिडनी | ऑस्ट्रेलियाच्या भूमिवर कसोटी विजयाचे स्वप्न कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघानं सत्यात साकारलंय. तब्बल 72 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमिवर पराभूत करण्याचा पराक्रम टीम इंडियानं केलाय. सिडनीत सुरू असलेल्या चौथ्या कसोटीचा पाचवा दिवस पावसानं वाया गेल्यामुळं हा सामना अनिर्णित राहिला. आणि भारतानं बॉर्डर-गावस्कर चषक 2-1 अशा फरकानं जिंकला. चौथ्या कसोटीत दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं कांगारूंसमोर 622 धावांचा डोंगर उभारला होता. याचा पाठलाग करताना कांगारूंची अक्षरशः दमछाक झाली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ 300 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतानं कांगारूंना फॉलोऑन दिला. पाचवा दिवसही पावसाने वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णित राहिली. आणि भारतानं ऐतिहासिक मालिका विजय साकारून देशवासियांना नव्या वर्षाचं गिफ्ट दिलं.