‘मिराज-2000’ने केली कमाल, जाणून घ्या या लढाऊ विमानाचे वैशिष्ट्य

4

नवी दिल्ली | भारतीय वायूसेनेने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेत हा हल्ला करण्यात आला. भारतीय वायूसेनेच्या ‘मिराज-2000’च्या 12 विमानांच्या समूहाने जैशच्या कँपवर 1000 किलोग्रामच्या बॉम्बचा वर्षाव केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे कंट्रोल रुम नेस्तनाबूत झाले. तर 200 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तान हल्ल्याचा सूड घेण्यात मोलाचे काम करणा-या या ‘मिराज-2000’ विषयी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

– मिराज 2000 विमान फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीव्दारे बनवण्यात आले. राफेल विमानही याच कंपनीने बनवले आहेत.

– मिराज-2000 हे चौथ्या जनरेशनचे मल्टीरोल, सिंगल इंजिन लढाऊ विमान आहे. 1970 मध्ये याच्या पहिल्या उड्डाणाचे आयोजन करण्यात आले होते.

– हे लढाऊ विमान जवळपास 9 देशांमध्ये आपली सेवा देत आहे. या विमानात वेळोवेळी बदल करण्याचे काम केले जाते.

– हे विमानात डबल सीटर आणि सिंगल सीटर असे दोन व्हर्जन आहे. याच्या दोन्हीही विंगवर वीपन सिस्टम उपलब्ध आहे.

– हे हवेतून डायरेक्टर हवेत हल्ला करु शकते. यासोबतच हवेतून जमीनीवरही हल्ला करु शकते. या फायटर जेटच्या एयर टू एयर मिसाइल सिस्टमची रेंज 60 किलोमीटरपर्यंत आहे.

– एकाच वेळी हे एयरक्राफ्ट 4 मिका मिसाइल, 2 मॅजिक मिसाइल, 3 ड्रॉप टॅक्ससोबत सुसज्ज होऊ शकते. मिराज 2000 लेजर गाइडेड बॉम्बही टाकू शकते.

– या एयरक्राफ्टमध्ये शस्त्र ठेवले जाऊ शकतील असे 9 पॉइंट असतात.

हेही वाचा – 

जैश आणखी हल्ले घडवणार याची माहिती होती.. त्याआधीच भारताने दहशतवाद्यांना संपवले – परराष्ट्र मंत्रालय

भारतीय वायूदलाचे सर्व स्तरातून कौतूक, राहूल गांधींचा सॅल्यूट, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

‘मिराज-2000’ने केली कमाल, जाणून घ्या या लढाऊ विमानाचे वैशिष्ट्य

एयरफोर्सच्या हल्ल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक

पुलवामाचा बदला : भारतीय हवाई दलाने केला 200 दहशतवाद्यांचा खात्मा, जैशचे कंट्रोल रुम उध्वस्त

भारताच्या हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान, मसूद अझहरला रुग्णालयातून गुप्त ठिकाणी लपवले