‘ते’ वक्तव्य भावनेच्या भरात : कुमारस्वामी यांचा यू-टर्न

बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जनता दलाचे नेते प्रकाश यांची अज्ञाताने हत्या केली. यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, कुमारस्वामी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये ते फोनवर बोलताना म्हणाले, प्रकाश यांचे मारेकरी सापडले की त्यांना गोळ्या घाला. यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या, मात्र ते विधान भावनेच्या भरात केलं होतं. तो कोणताही आदेश नव्हता, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.