कॉमेडी किंग कपील शर्मा अडकणार लग्न गाठीत, १२ डिसेंबरला प्रेयसी गिन्नी चतरथसोबत करणार लग्न

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत लग्न सराई सुरू आहे. 2 डिसेंबरला अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि हॉलिवूड सिंगर निक जॉन लग्न करणार असून आता बॉलिवूडचा आणखी एक कालाकार लग्नगाठीत अडकणार आहेत. कॉमिडी किंग कपील शर्मा योने त्य़ाच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. लग्न पत्रिकेवर राजमहल आणि हत्ती यांची चित्र आहेत. त्याचबरोबर मिठाई, ड्रायफ्रूट्य हे देखील लग्नपत्रिकेसोबत ठेवलेले दिसत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून कपील शर्मा आणि त्याची प्रेयसी गिन्नी चतरथ यांच्यात प्रेमसंबंध होते. आता त्यांच्या प्रेमाच रूपांतर लग्नात होत आहे. 12 डिसेंबरला कपिल आणि गिन्नी चतरथ लग्न करणार आहेत. पंजाबमधील जालंधर येथे कपिलच्या मूळगावी त्यांच्या लग्नाच्या सर्व विधी पार पडतील. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे कपिल-गिन्नी लग्न करणार असून यावेळी केवळ मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात येणार आहे. लग्नानंतर 14 डिसेंबरला अमृतसर येथे पंचतारांकीत हॉटेलमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. तर, बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्टूीतील मित्रांसाठी 24 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी सुनील ग्रोवरला केलेल्या मारहाणीमुळे कपिल प्रचंड वादात सापडला होता. त्यामुळे त्याच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली होती. डिप्रेशन, वजनात वाढ, गैर व्यसने, या सर्व गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या होत्या. तुर्ताय कपील त्याच्या आयुष्यातील विस्कटलेली घडी सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहे.