आदित्य पांचोलीने कंगनाच्या विरोधात दाखल केली तक्रार, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप

37

एएम न्यूज | कंगना रनोटची बहीण रंगोलीने आदित्य पांचोलीवर मारहाण तसेच शोषणाची तक्रार दाखल केली. मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये रंगोलीने ई-मेलच्या माध्यमातून मारहाण आणि शोषणाची तक्रार दाखल केली. यानंतर आदित्य पांचोलीने हे आरोप फेटाळले आहेत. सुमारे 13 वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. कंगनाच्या वकिलाने मला बलात्काराच्या खोट्या खटल्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप पांचोलीने केला आहे. यासाठी त्यानेही कंगनाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

13 वर्षांपूर्वीचे प्रकरण

पोलिसांनी याप्रकरणी तपासणी सुरू केला आहे. या आरोपात सांगण्यात आले आहे की, 54 वर्षांच्या आदित्यने कंगनाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिचे शोषण केले होते. तिला अनेकदा मारहाणही केली. तसेच आदित्यची पत्नी जरिना वहाबलाही या प्रकरणाची पूर्ण माहिती होती, असे तक्रारीत म्हटले होते. ही घटना 13 वर्षे जुनी आहे. त्यावेळी कंगना-आदित्यचे अफेअर होते, ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

मला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे : आदित्य

तर आदित्य म्हणाला की, माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहे. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, मी अभिनेत्रीवर मानहाणीची तक्रार दाखल केली आहे. ती केस माघारी घेण्यासाठी कंगनाच्या वकीलाने मला बलात्काराच्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली होती. माझ्यावर याच कारणामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निरर्थक आहे. असे आदित्य पांचोली म्हणाला.

अभिनेत्रीच्या वकिलाने दिली होती धमकी

आदित्य म्हणाला की, मी कंगनाच्या विरोधात मानहाणीची तक्रार दिली होती तेव्हा तिच्या वकिलांनी मला धमकी दिली होती. मी याची 18 मिनिटांची रेकॉर्डिंग केली. ही रेकॉर्डिंग मी पुरावा म्हणून पोलिसांकडे सोपवली आहे. 25 एप्रिलला वर्सोवा पोलीस माझ्या घरी नोटिस घेऊन आले होते, तेव्हा मी हैराण झालो. मी त्याच वेळी ती रेकॉर्डिंग त्यांना दिली आणि 12 मेला माझा जबाब नोंदवला. दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवल्यानंतर चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.