कुल घराण्याचा हा तिसरा बंड विजयी होणारच, कांचन कुल यांना विश्वास

बारामती | लोकसभा निवडणुकांच्या काळात बारामती येथील राजकारण चांगलेच तापले आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. यंदा शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार कांचन कुल या खासदार सुप्रिया सुळेंना टक्कर देत आहेत. त्यांचा प्रचार जोमाने सुरू आहे. मतदारांशी संवाद साधताना आपण विजयी होणारच असा विश्वास कांजन कुल यांनी व्यक्त केला. कुल घराण्यातील हे तिसरे बंड आहे आणि कुल घराण्याचा हा तिसरा बंड विजयी होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कांचन कुल यांच्या मिरवणुकीसाठी आणला घोडा

कांचन कुल यांची मिरवणुक काढण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोडा आणला होता. मात्र त्यांनी आपण विजयी झाल्यावर घोडा काय तर हत्तीवर बसून मिरवणूक काढू असे सांगितले. कांचन कुल म्हणाल्या की, घोडा हा शुभ मानला जातो. 1990 साली काँग्रेसने तिकिट कापले त्यावेळी सुभाष कुल यांनी बंड केला. ते घोडा या चिन्हावर निवडून आले. नंतर 2019 ला राहुल कुल यांनी पवारांविरूद्ध दुसरे बंड केले आणि तेही विजयी झाले आता मी तिसरा बंड पुकारालाय त्यामुळे वियज हा आपलाच आहे असा आत्मविश्वास कांचन कुल यांनी व्यक्त केला. सोमवारी रात्री गलांडवाडी गावात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी हे विधान केलं

सध्या बारामती लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. कांचन कुल यांनी सोमवारी पहील्यांचा इंदापूर प्रचार दौरा केला. आगमनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या गलांडवाडी करांनी चक्क कांचन कुल यांच्या स्वागतासाठी घोड्यावरुनचं मिरवणूक काढायची तयारी केली होती. मात्र त्यांनी घोड्यावर बसण्यास नकार दिला. मात्र घोडा हा शुभ मानला जातो सुभाष कुल यांनी बंड केला त्यावेळी घोडा या चिन्हावरचं लढत विजय प्राप्त केला. इंदापूर करांचा मला उत्सुर्त प्रतिसाद मिळत असल्याने विजय निश्चित असल्याचे ही त्यांनी सांगितले.