दमदार आहे ‘कलंक’चा टीजर, आकर्षित करतो भव्य-दिव्य सेट, प्रेमकथेवर आधारित आहे चित्रपट

1

नवी दिल्ली |‘कलंक’ चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. संजय दत्त, माधुरी दीक्षित, वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दोन मिनिटांचा हा टीजर आहे. यामध्ये भव्यदिव्य सेट पाहायला मिळतोय. यासोबतच वरुण धवन रंगभूमीवर वळूसोबत ‘बाहुबली’च्या भल्लाल देवप्रमाणे लढाई करताना दिसतोय. 17 एप्रिल रोजी ‘कलंक’ हा सिनेमा रिलीज होत आहे.

‘कलंक’ची कहाणी 1945 ची आहे. या काळात भारतावर इंग्रजांची सत्ता होती. चित्रपट प्रेम कथेवर आधारित आहे. चित्रपटात माधुरी दीक्षित बहार बेगम, संजय दत्त बलराज चौधरी, आलिया भट रुप, सोनाक्षी सिन्हा सत्य चौधरी, वरुण धवन सफर आणि आदित्य रॉय कपूर देव चौधरीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा सेट भव्य आहे. मात्र टीजरमध्ये कथा खुप विस्कळीत दिसतेय. मात्र करण जोहरने सेटवर खुप जास्त खर्च केला आहे.