‘कागर’चा ट्रेलर रिलीज : प्रेम आणि राजकारण या दोन वाटांवर चालणारी ‘राणी’

मुंबई | ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूचा ‘कागर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच. राजकारण या विषयावर आधारीत ‘कागर’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये रिंगू अस्सल राजकारण्याच्या भूमिकेत दिसतेय. ग्रामीण भागातील वास्तववादी राजकारणाचे चित्र या ट्रेलरमध्ये दिसतेय.

‘सैराट’ सिनेमात आर्ची साकारुन रिंकू राजगुरू महाराष्ट्रातील रसिकांच्या मनामनात पोहोचली. आता तिचा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातही रिंकू राजगुरू एका धाडसी मुलीच्या भूमिकेत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंज माने यांचा हा सिनेमा आहे.

‘आता एकतर लढायई शिकायची, नाय तर विरमरण पत्करायचं’, ‘प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं’ असे प्रभावी डायलॉग्स या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात. ग्रामीण भागातील राजकारणाची छाप या सिनेमात आहे. राजकारणी आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करतात. हे या ट्रेलरमध्ये दिसतेय. आजच्या काळात राजकारणातील परिस्थिती या ट्रेलरमध्ये दिसतेय.

रिंकू राजगुरू या ट्रेलरमध्ये एका सशक्त महिलेच्या भूमिकेत दिसतेय. तिचा अभियनही दमदार आहे. तर तिच्यासोबत अभिनेता शुभंकर तावडेही दमदार अभिनय करताना दिसतो. प्रियकर आणि राजकारण अशा दोन मार्गांवर चालताना ‘राणी’ची होणारी कसरत या ट्रेलरमध्ये दिसतेय. थेट मनाला भिडणारा हा ट्रेलर आहे. मात्र हा ट्रेलर पाहताना ‘सैराट’ सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सैराट सिनेमात आर्चीने उचललेली बंदूक, कागरमधील राणीनेही उचलली आहे. आर्चीप्रमाणेच राणी देखील तेवढीच भक्कम दिसतेय. 26 एप्रिलला हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे.