कादर खान यांच्या निधनाची अफवाच, मुलगा सरफराजकडून खुलासा

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांच्‍या निधनाची अफवा कालपासून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजलीही वाहिली. मात्र कादर खान यांच्या मुलाने मृत्यूची बातमी खोटी असल्याचं स्पष्ट केले आहे. कादर खान यांचे कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे निधन झाले नाही. असे सरफराज याने सांगितले.  दरम्यान, कादर खान हे लवकर बरे व्हावेत, यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटवर प्रर्थना केली.