साताऱ्यात भीषण अपघात; 250 फूट खोल दरीत जीप कोसळून चार ठार

सातारा | सांगलीतील भाविकांवर काळाने झडप घातलीय. साताऱ्यात भोजलिंगच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची जीप 250 फूट खोल दरीत कोसळलीय. यात चार जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले आहेत

हे सर्व भाविक सांगलीमधील आटपाडी तालुक्यातील विठलामपूर गावातील होते. भोजलिंगच्या डोंगरावर चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि जीप थेट दरीत कोसळली. अशी माहिती मिळतेय.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सध्या सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.