मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळाणार का? जया प्रदा यांनी आझम यांच्यावरील राग केला व्यक्त

नवी दिल्ली | समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मंत्री आझम खान यांच्या वक्तव्यानंतर आता वातावरण तापले आहे. आझम खान यांनी जया प्रदांवर वाईट शब्दात टीका केली होती. यानंतर आता रामपूर येथून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या जया प्रदांनी त्यांना उत्तर दिले आहे. जया प्रदा म्हणाल्या की, तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करत आहात, तुमच्या घरात आई बहीण नाही का? तसेच मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? असा सवालही त्यांनी आझम यांना विचारला आहे. तसेच मी तुम्हाला घाबरुन रामपूर सोडणार नाही असेही जया प्रदा म्हणाल्या.

रामपूर लोकसभेचे सपाचे उमेदवार आझम खान यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार जया प्रदांविषयी अश्लिल भाषेत टीका केली होती. आझम खान यांच्या या टीकेनंतर त्यांची निंदा केली जात आहे. आता जया प्रदा यांनी स्वतः त्यांना उत्तर दिले आहे. जया प्रदा म्हणाल्या की, आझम खान यांनी जे शब्द त्यांच्या तोंडून काढले आहेत, ते मी माझ्या तोंडून कधीच काढणार नाही आणि काढूही शकणार नाही. जया प्रदा म्हणाल्या की, आजम खान ही व्यक्ती सुधारणारी नाही आणि आता तर त्यांनी हद्द पार केली आहे.

जया प्रदा पुढे म्हणाल्या की, अशी टीका करणाऱ्या आझम खानच्या घरी आई बहीण नाहीत का? की ते त्यांच्या घरातील महिलांसोबतही अशाच प्रकारे बोलतात. जया प्रदा म्हणाल्या की, यावेळी आझम खान यांनी हद्द पार केली आहे. आता त्यांच्यासोबत माझे कोणतेही नाते नाही. आझम खान ज्या प्रकारे वागत आहे ते पाहून रामपूरची जनता त्यांनी कधीच माफ करणार नाही.

मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळाणार का?

जया प्रदा यांनी आझम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी मेल्यावर तुम्हाला समाधान मिळणार का? यानंतर त्या म्हणाल्या की, त्यांच्या या टीकेला घाबरुन मी रामपूरमधून पळून जाणार नाही. जया प्रदा यांनी आझम खान यांना खुले आव्हान देत म्हटले की, मी तुम्हाला पराभूत करेल आणि मग सांगेल की, जया प्रदा कोण आहे.

आझम खान यांनी जया प्रदांविषयी एकदम खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. एखाद्या महिलेविषयी असे बोलणे योग्य नाही. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. जया प्रदा यांनीही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.