चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, संघात तीन बदल

सिडनी | उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. यामध्ये तीन बदल केलेत. इशांत शर्माला आराम देण्यात आला. तर रोहित शर्माने माघार घेतली आहे. भारताने जाहीर केलेल्या 13 जणांच्या संघामध्ये उमेश यादव, आर. अश्विन, कुलदीप यादव आणि केएल राहुल यांना स्थान देण्यात आले आहे. हा कसोटी सामना उद्यापासून सिडनी येथे होणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून 3-1 ने मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे.