India vs New Zealand 1st ODI : न्यूझीलंडमध्ये भारताची विजयी सलामी

मालिकेत 1-0ने आघाडी

नेपीयर | न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलाय. 8 गडी राखून भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला. सुरूवातीला फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर 158 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, मधल्या काही षटकांदरम्यान प्रखर सुर्यप्रकाराशामुळं सामना थांबवण्यात आला. त्यामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार, भारताला एक षटक आणि दोन धावा कमी करुन 156 धावांचे आव्हान देण्यात आलं. हे आव्हान भारतानं 34.5 षटकांतच पूर्ण केलं. भारताकडून शिखर धवननं नाबाद 75 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीनं 45 धावांची खेळी केली.