भारतीय महिला संघाचा 8 गडी राखून न्यूझीलंडवर दमदार विजय

मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी

माउंट माऊंगानुई | न्यूझीलंडमध्ये दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय महिला संघाने विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभूत केलं आहे.यासोबतच 3 सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघानं 2-0 ने आघाडी घेतलीय. न्यूझीलंडने दिलेले 162 धावांचे आव्हान भारतीय महिलांनी सहज पुर्ण केले. महाराष्ट्राची कन्या स्मृती मंधाना आणि कर्णधार मिताली राज यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला आहे. सामन्यात स्मृतीने नाबाद 90 तर मिताली राजने नाबाद 63 धावांची खेळी केली. स्मृती मंधानाला तिच्या कामगिरीमुळे सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.