IND vs AUS : ढगाळ वातावरणामुळे सामना थांबवला, ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 236 धावा

सिडनी | भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. सध्या पंचांनी ढगाळ वातावरणामुळे काही काळासाठी सामना थांबवला आहे. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 बाद 236 धावांपर्यंत मजल मारलीय. भारताकडून कुलदीप यादवने 3 बळी घेतले. तर रविंद्र जाडेजाने 2 आणि मोहम्मद शम्मीने 1 बळी घेतला आहे. तसेच, ऑस्ट्रेलायाकडून मॅरक्युस हॅरिसने सर्वाधिक 79 धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र मैदानात जास्त वेळ तग धरता आला नाही. दरम्यान, चेतेश्वर पुजारापाठोपाठ यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंतच्या मोठ्या धडाक्यामुळे भारतानं 622 धावांचा डोंगर उभा केला आहे.