लातुरात अवैध वाळू उत्खननचा बळी

2

देवणी | तालुक्यातील बोरोळ येथील कामगार अवैध वाळूच्या उत्खननाता ढिगाराखाली गाढले गेल्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाले आहे. वाळू उत्खनन करतांना अचानकपणे वाळूचा ढीग अंगावर कोसळल्याने बाळू ऊर्फ मंगेश संजय म्हेत्रे याचा जागीच मृत्यू झाला. तर रेवन राऊळे हा गंभीर जखमी झाला आहे.राऊळे यास उदगीर येथील खाजगी रूगणालयात उपचार सुरू आहेत. तर मयत मंगेश संजय म्हेत्रे याच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

मात्र, याविषयी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आले नसून देवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कवठेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता कोणीही तक्रार दिली नाही. गावातील जवळपास चाळीस व्यक्तीच्या सहीने निवेदन देण्यात येवून तक्रार नसल्याचे पोलिस निरीक्षक कवठेवाड यांना सांगितले असून अद्याप गुन्हा झालेला नाही. आजवर देवणी तालुक्यात वाळू साठीचे शासकीय निविदा निघाली नसून अवैध वाळूच्या धंद्याचा हा पहिला बळी असल्याचे चर्चीले जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दूर्लक्ष होत आहे. एक लाख सतरा हजार नऊशे रूपयाच्या रॉयलटीवर तालुक्यात हा गोरखधंदा सरू आहे.

illegal sand excavation, 1 dead