देवाच्या कृपेने मी सुखरूप.. अपघाताच्या अफवांवर सुरेश रैनाचे स्पष्टीकरण

स्पोर्ट्स वर्ल्ड | गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या अपघाताच्या काही बातम्या सोशल मीडियावर येत आहे. आता स्वतः सुरेश रैनाने ट्विटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिले आहे. देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरा आहे.. असे स्पष्ट करत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सुरेश रैनाने दिला आहे.

कुटुंबीयांनी मनस्ताप..
ट्विटरवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये सुरेश रैना म्हणाला की, ‘गेल्या काही दिवसांपासून कार अपघातामध्ये मी जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. या संपूर्ण गोंधळामुळे माझे कुटुंबीय आणि मित्रांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला. पण अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करा. देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरी आहे. अशाप्रकारचे वृत्त पसरवणाऱ्यांवर लवकरच कडक कारवाई केली जाईल.’

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या सुरैश रैनाने नुकत्याच झालेल्या रणजी करंकडकात उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले.