देवासमोर प्रार्थना करताना दिसला विल स्मिथ, शेअर केला भारत यात्रेचा फोटो

नवी दिल्ली | हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथ काही काळापूर्वी भारत दौऱ्यावर आला होता. या दरम्यान त्याने हरिद्वारसोबतच अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. विल स्मिथने सोशल मीडियावर आपल्या भारत भेटीचे काही फोटोही शेअर केले आहे. हे फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये विल स्मिथ देवासमोर बसून प्रार्थना करताना दिसत आहे.

यासोबतच तो आरतीदरम्यान लोकांसोबत बसलेला दिसतोय. त्याने या फोटोला कॅप्शन दिले की, “देव अनुभवातून शिवकत असतो असे माझी आजी म्हणायची. भारताची यात्रा आणि रंगांचा अनुभव घेताना लोकांची आणि निसर्गाच्या सुंदरतेने माझ्यामध्ये माझी कला, जगातील सत्यतेविषयीची समज निर्माण केली आहे.” या फोटोंना आतापर्यंत 14 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

विशेष म्हणजे विलने पहिल्यांदाच भारताविषयीचे प्रेम व्यक्त केलेले नाही. काही दिवसांपूर्वीही त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्याचा आणि ऑटो रिक्षाचा प्रवास करण्याचा अनुभव शेअर केला होता. विलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तो रिक्षाचा प्रवास अनुभवताना दिसत होता.