पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती

पुणे | नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पुण्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी याबाबतचा आधिच निर्णय घेतला होता. यानुसार आजपासून ही सक्ती लागू करण्यात आली. मात्र, पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीची बैठक होणार आहे.