मोदी सरकारकडून न्यू इअर गिफ्ट; टीव्ही, कॉम्प्युटर होणार स्वस्त

नवी दिल्ली | कॉम्प्युटर आणि टीव्हीचा मॉनिटर, पॉवर बँक, युपीएस, मोबाईल बॅटरीज तसेच 100 रूपयांवरील सिनेमांची तिकिटे स्वस्त होणार आहेत. दिल्लीत आज 31 वी जीएसटी परिषद पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आल्याची घोषणा केली. येत्या 1 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या वस्तू होणार स्वस्त
> यापुढे 100 रूपयांपर्यंतच्या सिनेमाच्या तिकिटावर 12 टक्के जीएसटी तर 100 रूपयांपेक्षा जास्त तिकिटावर 18 टक्के जीएसटी.
> 32 इंची एलईडी टीव्हीवर 28 ऐवजी 18 टक्के जीएसटी.
> टायर, VCR,लिथियम बॅटरीवरही 18 टक्के जीएसटी.
> जनधन खात्याला जीएसटीमधून वगळले.
> दिव्यांग व्यक्तींसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर 5 टक्के जीएसटी.