गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर वर्षभरानंतर राज्य सचिवालयात

गोवा | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज राज्य सचिवालयात आले तेव्हा भाजपा कार्यकर्ते, नेते आणि सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्यावर्षी फेब्रुवारीपासून पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज ते वर्षभरानंतर राज्य सचिवालयात आले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली.