छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

दोघांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार

बीड | छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथे घडली आहे. शाळेत जाताना अमर तिडके आणि हनुमंत सांवत हे दोघे तिला सतत त्रास द्यायचे. याला कंटाळून घरातील तणनाशक पिऊन मुलीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा वडवणी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.