IND VS AUS : चौथ्या कसोटीत भारताचा 7 बाद 622 धावांचा डोंगर

सिडनी | सिडनीत सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटीवर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने 7 बाद 622 धावांवर डाव घोषित केला. भारताकडून कसोटीवीर चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 193 धावा केल्या. त्याचे द्विशतक थोडक्यात हुकले. यष्टीरक्षक ऋषभ पंतनेही 159 धावांची धडाकेबाज खेळी केली. रविंद्र जडेजाने शानदार अर्धशतकी खेळी केली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद 24 धावा केल्या. दरम्यान, सिडनीत कसोटी सामन्यात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम भारताच्याच नावे आहे. भारताने 2004 मध्ये सिडनी कसोटीत 7 बाद 705 असा धावांचा डोंगर उभारला होता.