अमेरिकेचे माजी अध्यक्ष सीनियर जॉर्ज बुश यांचं निधन

वॉशिंग्टन | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर जॉर्ज बुश यांचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आणि माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ही माहिती दिली. त्यांना शीत युद्ध संपविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी ओळखले जाते.

12 जून 1924 रोजी जन्मलेल्या जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांनी 1989 पासून 1993 पर्यंत अमेरिकेचे 41वे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी बुश 1981 पासून 1989 पर्यंत उपराष्ट्राध्य होते. त्यांची राजकीय कारकीर्द तीन दशकांची होती.