मुंबईत CSMT स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू, 30 जखमी

1

मुंबई | मुंबई येथील सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघातात तीन महिलांसह जण दगावले आहेत. तर 30 लोक यामध्ये जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास गर्दीमुळे हा पूल कोसळला. अपघातातील जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दुर्घटनेमुळे एका बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेतील जखमींचा आकडा मोठा आहे. राज्य सरकारकडून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय 35), सारिका कुलकर्णी (35), रंजना तांबे (40),  तपेंद्र सिंग (35), मोहन कायगडे (55) आणि जाहीद सिराज खान (32) या सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

तर जखमींमध्ये सोनाली नवले (वय 30), नंदा विठ्ठल कदम (56), राकेश मिश्रा (40), अत्तार खानअद्वित नवले (3), राजेंद्र नवले (33), राजेश लोखंडे (39), तुकाराम येडगे (31), राम कुपरेजा (59), जयेश अवलानी (46), महेश शेरे, अजय पंडित (31), हर्षदा वाघले (35), विजय भागवत (42), सुनील गिरलोटकर (39), अनिकेत अनिल जाधव (19), अभिजीत मान (21), राजकुमार चावला (49), कनुबाई सोलंकी (47), सुभेष बॅनर्जी (37), रवी लागेशेट्टी (40), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (43), आयुशी रांका (30), सिराज खान (55), राजेदास दास (23), (45), सुजय माझी (28), दीपक पारिख यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला बीटी लेनशी जोडणारा हा पादचारी पूल आहे. हा पूल कोसळल्यानंतर जखमींना सेंट जॉर्ज आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.