‘बिल मिळालं नाही तर जेवण फुकट’, रेल्वेची कॅटरिंग सेवा पारदर्शी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई | यापुढे रेल्वे प्रवासात कॅटरिंग सेवेच्या कर्मचाऱ्यांनी जेवणाचे बिल दिले नाही तर, त्यांना पैसे देऊ नका. रेल्वे मंत्रालयानंच तसा निर्णय घेतला आहे. रेल्वेची कॅटरिंग सेवा पारदर्शी करण्यासाठी रेल्वेमंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेवणाचे बिल दिले नाही तर पैसे देऊ नका, असा बोर्डच रेल्वेगाड्यांमध्ये लावला जाणार आहे. यावर खाद्यपदार्थांच्या किंमती लिहिलेल्या असतील. त्यामुळे आता रेल्वेत जेवणाचे बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना दणका बसणार आहे.