शिवशाही बसने भररस्त्यात पेट घेतला, सुदैवाने जीवितहानी टळली

चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले 9 प्रवाशांचे जीव

नागपूर | शिवशाही बसच्या अपघातांचे सत्र थांबता थांबत नाही. आता नागपूरमध्ये धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली. पण चालकाच्या सतर्कतेमुळे यातील प्रवाशांचा जीव वाचलाय. ही बस नागपूरहून यवतमाळला जात होती. त्यावेळी नागपूर-वर्धा महामार्गावर असताना अचानक बसने पेट घेतला. यावेळी चालक रंगराव गणपत काकडे यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ बसमधील 9 प्रवाशांना खाली उतरवले. बुटी बोरी एम आय डी सी पोलीस स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी जावून संबधित घटनेचा पंचनामा केला.