ऐश्वर्याविषयी विवेक ओबेरॉयचे ट्विट, सर्व स्तरातून टीकेची झोड

235

मुंबई | अभिनेता विवेक ओबेरॉयने आज आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिषेक, आराध्यासोबतचे तीन फोटोज आहेत. सलमान, ऐश्वर्याच्या फोटोवर ‘ओपिनियन पोल’ लिहिले होते, ऐश्वर्या विवेकच्या फोटोवर ‘एग्झिट पोल’ लिहिले होते, तर नवरा अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतच्या फोटोवर ‘रिजल्ट्स’ असे लिहिले होते. मात्र विवेकचे हे ट्विट आल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे.

विजया रहाटकर पाठवणार नोटीस 

पद्मश्री मिळालेल्या महिलेचा अपमान, विवेक ओबेरॉय यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा : नवाब मलिक

महिलांचा अपमान करणार्‍या विवेक ओबेरॉय याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. फिल्म अभिनेता विवेक ओबेरॉय हे भाजपला समर्थन देऊन महिलांनबाबत मर्यादा सोडून अपशब्द बोलत आहेत. एका पद्मश्री मिळालेल्या महिलेचा अभिनेता विवेक ओबेरॉय एक्झिट पोलच्या नावाखाली अपमान करत आहेत. महिला आयोग झोपले आहे का ? असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392