वाशीममध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवले जीवन

वाशीम – मंगळपूर तालुक्यात अल्पभुधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विकास राजाराम गिर्हे (वय 38 वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी रात्री विहीरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

तीन भावंड असलेल्या विकास यांच्याकडे केवळ एक एकर जमिनीचा हिस्सा होता. त्यांच्यावर बँकेचे कर्ज तसेच खासगी सावकाराचे 50 हजार रूपयांचे कर्ज होते. त्यातच घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या विंवचनेला कंटाळून त्यांनी शनिवारी आत्महत्या केली. त्याच्यांमागे आई, पत्नी, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.