बीडमध्ये कोरड्या विहिरीत शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून संपवले जीवन

बीड |  तालुक्यातील लोळदगावमध्ये नापिकीला कंटाळून 75 वर्षीय शेतकऱ्याने काेरड्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. गंगाधर महादेव साळुंके असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे चार ते पाच एकर जमीन होती. दुष्काळाचे संकट आणि त्यातच नापिकीमुळे त्यांनी शनिवारी आहेर निमगाव शिवारात एका कोरड्या विहिरीत उडी घेतली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शासनाकडून अद्याप ठोस पावले नाही 
चारच दिवसांपूर्वी लोळदगावमध्ये 60 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी गंगाधर यांनीही नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, शासनाकडून अद्याप कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे.